स्वकुळ साळी समाज (विणकर) यांचे आराध्य दैवत, आद्य वस्त्र निर्माता
शिवपुत्र, भगवान श्री जिव्हेश्वर मंदिर संस्थान, अंजनगाव सुर्जी.
स्वकुळ साळी समाज (विणकर) यांचे आराध्य दैवत, आद्य वस्त्र निर्माता
(राष्ट्रीय हातमाग दिन - विणकर दिवस)
स्वातंत्र्य लढ्याच्या काळात ०७ ऑगस्ट १९०५ रोजी स्वदेशी चळवळ सुरू करण्यात आली. या चळवळीमुळे स्वदेशी उद्योगांना विशेषतः हातमाग विणकरांना मोठा आधार मिळाला होता. या ऐतिहासिक चळवळीचे स्मरण म्हणून दरवर्षी ७ ऑगस्ट हा दिवस 'राष्ट्रीय हातमाग दिन' (विणकर दिवस) म्हणून साजरा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय २०१५ साली भारताचे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने घेतला.
विणकरांसाठी केंद्र व राज्य सरकारने हाती घेतलेल्या विविध कल्याणकारी योजना व उपक्रमांची माहिती देऊन त्यांच्यामध्ये जनजागृती निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. देशातील हातमाग विणकर समुदायाप्रती आदर व सन्मान व्यक्त करणे, त्यांच्या अप्रतिम कलाकौशल्याचा गौरव करणे आणि भारताच्या सामाजिक व आर्थिक विकासात या क्षेत्राच्या अमूल्य योगदानाची यथोचित दखल घेणे हा या दिवसाचा मूळ हेतू आहे.